शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

ताप नको मज कुठलाही अन व्याप नको आहे
उत्तर कुठले? मुळात मज प्रश्न नको आहे!
या प्रश्नांशी अवघ्या करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला !
बधिरतेच्या पुंगीवारती मी नागोबा डुलतो....

आता आता छाती केवळ भीती साठवते
डिंगर बघता उंची नाही, खोली आठवते!
आत कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी?
आत नाही रात्रही उरली पूर्वीगत होशी!
विलान्दारीने कालान्दारीचे गाणे मी गातो...

कळून येत जगण्याच्या या इवूल्याश्या त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा!
दरी नाही फिरकत कुठला नवा छंद, चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचादेखील आत कंटाळा येतो....