जगातील सगळीच माणस कशानतरी भारलेली असतात या भारलेपणातच काहीतरी विशेष असतं अन्यथा जीवन म्हणजे भकास वाळवंट होऊन जाईल. रितेपणाचं वा निवृतीचं जीवन जगण खूपच कठीण असतं. यामुळे कशात तरी मन गुंतवण आलचं! सगळी यशस्वी माणसं कोणत्या न कोणत्या तरी शक्तीने भारलेली होती. इतिहासात याच्या अनेक नोंदी सापडतील. त्यांची वाट साधी सोपी नव्हतीच, मात्र, त्यांनी अनेक अडचणींवर झुंजून मात केली आणि आमचा ठसा उमटविलेला दिसतो.
आजकालच जीवनच मुळी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे आहे. भारलेल्या दशेत अंगात नुसती झिंग चढलेली आहे. आपुलकी जिव्हाळा प्रेम, मायेचे चार शब्द ऐकणे दुरापास्त झालेले आहे. सगळीकडे कसा टापटीपपणाचा चकचकाट दिसून येतो. भावनेची जागा पैशाने घेतली. आणि संवेदना रापास्त झाली. हे विदारक सत्य निस्सीम आनंदापासून शेकडो मैल दूर पडले आहे.
खरा कलावंत कलंदर माणूस व्यवहारीपणाच्या बुरख्यात अधिक काळ जखडून राहू शकत नाही. निसर्गातील अनेक घटक त्याला साद घात असतात. त्या घटकांकडे तो विजेच्या चपळाईने धाव घेत असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणातील आनंद वा दुखः उपभोगण्यासाठी आसुरलेल असतं. गत आयुष्यातल्या बर्या वाईट गोष्टीत मन घुटमळत असते. प्रत्येकवेळी नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते... निरपेक्ष भावनेने...!
"आयुष तेच आहे आणि हाच पेच आहे
तू भेटशी नव्याने बाकी सारे जुनेच आहे."
या कवितेत आंतरिक तळमळ व्यक्त करण्यात आली आहे. प्रवाहात अनेक माणसं भेटतात, हसतात, साथ-सोबत करतात. पुढे कालांतराने दुरावतात. आपली माणसं दूर गेल्याचं दुखः खूप मोठ असतं. पण., दुःखाची मैत्री करण्याचं सामर्थ्य कलंदरामध्ये नक्कीच असतं. पुढे कधीतरी ती माणसं पुन्हा भेटतात. जुन्या आठवणी ताज्या होतात. सार विश्व नव्यानं प्रगटत. पण, वेळ गेलेली असते. पुन्हा भरेल कि नाही याची शाश्वती नसते. आणि मनाशी प्रतारणा होणार नाही. याची भीती नेहमीच डोकावत असते यामुळे कलंदराला अनेक सुखांवर पाणी सोडावे लागते.
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०
रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०
भक्ती!
बळीराजाला पेरणी मशागतीतून उसंत मिळाली... पावसाने धो, धो, कोसळून सुट्टी घेऊन... ऊन पावसाचा खेळ सुरु झाला... अंकुरलेले बीज ऊन पाणी, वार्याबरोबर डोलू लागले... किवा चैतन्याचे वारे वाहू लागले कि सण, उत्सव सुरु होतो. भक्ती अशी शक्ती आहे , कि जिच्यामुळे सर्वस्व पणाला लागले तरी, विश्वास ढळू शकत नाही. मराठी समाजाला संतश्रेष्ठांची मांदियाळी लाभलेली आहे. ज्यांनी अनेकवर्षे तलवारीच्या जोरावर जे करू शकले नाहीत ते संतांनी केवळ भक्तीच्या जोरावर साध्य केले. आत्मसमर्पणाची भावना जेव्हा वाढीला लागते तेव्हां भक्ती जन्म घेते.
पंढरपूरचा विठ्ठल अवघ्या मराठी मनाच श्रद्धास्थान. दरवर्षी आषाढी, कार्तीकेला लाखो वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला जातात. पायी निघालेली वारी हा भक्तीचा महासागर असतो. समाजातल्या अठरापगड जाती एकभावनेने, एक प्रेरणेने, एक लक्षाने, एक विश्वासाने आणि एक दिलाने वारीमध्ये सामावतात. असंख्य स्त्र्र-पुरुष चैतन्याच्या वातावरणात अवर्णनीय सुखाची अनुभूती ते अनुभवत असतात. आयुष्यातल्या खाच्ख्लाग्यानी खंगत असलेल्या मनाला नवी उभारे देण्याच सामर्थ्य भक्तीमध्ये असत.
"अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तीनही लोक
जाईन गे माये त्या पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया"
हि सुखाची कल्पना कीर्ती सोज्वळ, सुंदर आणि सात्विक आहे। मनाला कोंडून ठेवणे जितके कठीण तितकेच कठीण असते। मनाचे वर्णन करणे, माणूस कितीही नास्तिक असो, तो कशावरती जीव लावतोच आणि जीव लावणे म्हणजेच भक्ती जडणे, आयुष्यातील सगळेच प्रसंग एकसारखे नसतात। आणि ते नसावेतही। प्रत्येक क्षण काहीतरी नवंवा नव्याने शिकवून जातो. तो अनुभवण्याची पर्यायाने शिकण्याची कला, मात्र आपल्याकडे असावी लागते. केवळ एका आशेच्या कवडशावर आयुष्य सुसह्य करता येते.
श्रद्धा हि व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपातही असते. भक्त देवावर एकतर्फी प्रेम करत असला तरी त्यातून मिळणारी अनुभूती लाखमोलाची असते. आणि यामुळेच पावसाच्या रिपरीपित, वार्याच्या घोन्गावात काटयाकुट्याच्या रस्त्यावर डोकीवर तुळशीवृंद हेऊन वारीत सामील झालेल्या स्त्रीच्या तोंडी
" टाळी वाजवावी, गुढी उभारावी
वाटही चालावी पंढरीची!"
असेच शब्द आहेर पडतात. भक्तीला मोल नाही. सुख-दुखाचा पाढा वाचायला वेळ नाही, भक्ती फक्त भक्ती असते. ती मनातून जन्मते आणि नसानसातून भिनते.

तरुणाई

तरुणाई हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय! सर्वांचा हवाहवासा वाटणारा हा जीवनाचा टप्पा! उत्साह, धैर्य, शक्ती, बिनधास्तपणा यांनी ओसंडून वाहणारा प्रवाह! या काळात प्रत्येक जफास्ट्रकवर राहण्याची अपेक्षा बाळगून असतो. तसेच स्वतःच वेगळ विश्व निर्माण करण्याच्या घाईगडबडीत असतो. आणि हळुवार पावलांनी हे मोरपंखी दिवस कसे संपून जातात हे कळत नाही.
शिक्षण, नोकरी, व्यावसाय मित्रमैत्रिणी व जीवनसाथी निवडणे अशा अनेक आघाडयांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करायचे असते. यातच स्पर्धेच युग! या युगात स्वतःचा वेगळा कस निर्माण करण्याचे आव्हान. चालताना., बसमध्ये, वाहन चालवताना, मोबाईलवर बोलताना, काम करताना निव्वळ आणि निव्वळ धांदल.कितीही दगदग आणि तणाव असला तरी या वयाची लज्जतच काही और असते यामुळे तरुणाई नेहमीच स्मरणात राहते.
तरुणाई म्हणजे उत्साह. उमेद, प्रेम आणि धैर्याचा सुरेख मेळ....! कालानुरूप तरुणाई मधेही खूप फरक पडतो. कुठे बनगरवाडीतील धोतराचा सोगा पकडून शाळेतील विद्यार्थी शोधणारा तरुण शिक्षक तर कुठे आजचा इंग्रजी हाय-फाय बोलत बीपीओ, कॉलसेंटरमध्ये गडगंज पैसा कमावणारा तरुण.यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तरुणाई म्हणजे हुरहूर, तरुणाई म्हणजे दगदग.... तरुणाई म्हणजे बडबड तरुणाई म्हणजे गडबड, गोंधळ
तरुणाईचा काळ म्हणजे नाविन्याचा शोध घेण्यासाठी निसर्गाने उभारलेल मुक्त विद्यापीठ. जिज्ञासा, निकोप दृष्टीकोन आणि समजूतदारपणा यामुळे जीवनाला गहीरेपानाचे रंग प्राप्त जातात. या उमेदीच्या काळात माणूस घडत असतो, भरारी घेत असतो, बिघडत असतो, कोसळत असतो. मात्र त्याच्या पाहणार्याच्या दृष्टीकोनावर बदल घडत असतात. हा काळ जितका लाभदायक, तितकाच धोकादायक. तरुणाईच्या नाक्यावर अनेक वाटा फुटलेल्या असतात. मनाला आवरणे अतिशय कठीण होऊन जाते. येथून फक्त एकाच वाट निवडावी लागते. जी पुढे आपली जीवनरेषा होऊन जाते.
प्रचंड शक्तीचा अदभूद साठा असलेल्या तरुणाईचा वापर झाल्यास अनेक विधायक कार्ये अगदी सहजपणे होऊन जातात. याची अनेक उदा. देता येतील. पण व्यसनाधीनतेच्या गर्केत वाढणारी तरुणाई विघातक ठरतात. यामुळे तरुणाई हा अमुल्य वेळ आहे. याचा वापर फुलण्यासाठीच करावा.
वय हलक्या हलक्या पावलांनी जरी निघून जात असले तरी मनाने सदैव तरुण राहिलेल्या तरुणाईची गर्द निळाई अनुभवण्यास येईल.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)