बुधवार, २१ डिसेंबर, २०११

दूर पाउस कोसळून गेला

" दूर पाउस कोसळून गेला                
दवांना ललाटी तुझ्या आसारा...!!
 
काळ्या विवरात विरले मेघ
सुर्य ढळता कुणाचे वेध ?  
ऊर आतुन पोखरुन गेला ..... 
दवांना ललाटी तुझ्या आसरा !!
दूर पाऊस कोसळून गेला !!
निळ्या अंबराला कळेना कधी
धुंद पवना कळेना ही भाषा ..
सूर शोधून सुचवून गेला !!! 
दवांना ललाटी तुझ्या आसरा ... 
दूर पाऊस कोसळून गेला ! ! 
माझ्या पावसाला विचारा तरी  
कधी तो बरसेल वेड्याच्या दारी ??
चिर कोरुन ह्रिदयात गेला ..!!
 दवांना ललाटी तुझ्या आसरा ...
 दूर पाऊस कोसळून गेला !!!"

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

काही कळतच नाही ,,,,.

 
काही कळतच नाही ,,,,..
पाऊस येन आणि तुझ येन ,,,,
पाऊस आला कि तू येतेस कि ...
तू आलीस कि पाऊस येतो ,,
काल असच झाल ,,,तू आलीस ....
... ... ... पावसाचा अंदाज असतानाच ..
गडबडीत हातात काहीतरी दिलेस .
आणि म्हणलीस ,,,,
पाऊस येईल भिजेन मी जाते ,,,
बर्याच दिवसातून आज भेटणार होतीस ,,,
खरच हा पाऊस पण न ....?
काही कळतच नाही ,,,,..
पाऊस येन आणि तुझ येन ,,,,
पाऊस आला कि तू येतेस कि ...
तू आलीस कि पाऊस येतो ,,
हातात दिलेलं काय होत ,,,
बघितलं तर एक छत्री आणि एक चिट्टी,,,
चीट्टीत काय होत ,,,
उद्या छत्री घेऊन पावसात भेटण्याचे ठिकाण ,,,,
खरच हा पाऊस पण न ....?
काही कळतच नाही ,,,,..
पाऊस येन आणि तुझ येन ,,,,
पाऊस आला कि तू येतेस कि ...
तू आलीस कि पाऊस येतो ,,

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

आठवणी.....

तुझी आठवण आली आणि
पावसाला सुरूवात झाली.........
ढगान्चा गडगडात विजेचा कडकडात
मनी होत होत्या आठवणी
अजूनच दाट.............
... आठवणी आणि पाऊस दोन्ही
वाढतच -बरसतच गेल्या.........
प्रत्येक थेम्बाने तुझा
स्पर्श जाणवून दिला.............
वा-याच्या झुळूकी सोबत
मातीचा सुगंध जणू
तुझाच तो भासला.................
आठवणीचे आणि पाण्याचे
ओहोळ वाहतच राहिले........
सूर्य तरी कसा मागे राहिल
तोही तुझी आठवण घेवून आला
आणि मनाच्या आभाळात
इन्द्रधनुष्य देवून गेला...............
मनाची अवस्था झाली अशी
पाऊस पडल्यावर आपल्या
रस्त्याची होते जशी.............
पाऊस आता थाबला आहे
पण आठवणीना कुठे
बंधारा आहे..................................!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

तुझ्याशिवाय

तुझ्याशिवाय

आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची

पान पान शहारून येत
तेव्हा दवबिंदूने लाजायचं नसत
मरण कुशीत येईल आता
म्हणून पानाने ओसरायच नसत
तेव्हा पहायची फक्त वाट
आसवाने डोळ्यांची आणि
अर्ध्या जागलेल्या स्वप्नाने
तुझ्या आभासांची

होईल वाऱ्याची ओळख
तेव्हा फुलाने दरवळायच असत
अस असत दुख म्हणून
गंधाने वेदनेला टिपायच नसत
तेव्हा मात्र कराययचाच फक्त घात
विव्हळणार्या चांदण्यांनी
क्षय झालेल्या पौर्णिमेचा आणि
अस्तीवाहीन वाऱ्याच्या ओळखीने
तुझ्या जाणीवेचा

पसरतील हात अंगणाचे जेव्हा
तेव्हा करायची अंधाराची मुठ
काळोखाला नसतेच जाग
उजेडातल्या सावल्यांची म्हणून
क्षीतीजाने काजळायाच नसत
त्याने जाळायची वात
सूर्याच्या विभोर स्पर्शाची आणि
काळ्याभोर शाईने तुझ्या कवितांची
बस्स इतकंच मग झाल
आणखीन काय ???
तुझ्याशिवाय इतक बास आहे मला

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

पाऊस पडून गेल्यावर........

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले

थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा

पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे

मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती

पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्�या, विझलेला शांत निजलेला

पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा

भरलेला पाऊस मी


भरलेल्या डोळ्यांनी पाहिला होता..
भर पावसात हात निसटताना ही
अश्रू डोळ्यात राहिला होता...

होते रुसवे फुगवे, होते अनेक बहाणे
तिला चिडवून तिलाच समजाविणे..
तिच्या आठवणीत मन माझे शहारले होते
तिच्या सोबत घालवलेले क्षण तेव्हा डोळ्यातून निसटले होते...

माझे अश्रूसुद्धा त्या पावसात मिसळले होते
साथ माझी सोडताना मी त्यांना पाहिले होते..
मनाचा नभ डोळ्यांच्या कडांवर विसावला होता
तू दूर गेल्यावर तो बांधही त्यांनी फोडला होता...

सुटलेला गार वारा मला स्पर्शुनी सांगत होता
आता हा खेळ फक्त आठवणींचा राहिला होता..

भरलेला पाऊस मी.. भरलेल्या डोळ्यांनी पाहिला होता.

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

आठवणीतला पाऊस



पाऊस बालपणीचा
व्रात्य खोडकर मुलासारखा
कागदाच्या होडया करायला लावून
चिखलात मनसोक्त भिजवणारा
पाऊस शाळेच्या वयातला
दप्तर आणि रेनकोट सावरत
लवकर शाळा सुटण्याची
वाट पहायला लावणारा...
पाऊस तरुण वयातला
एकाच छत्रीत फिरताना
नकळत होणार्या स्पर्शाने
अंगावर रोमांच फुलविणारा...
पाऊस उतारवयातला
तब्येतीला सहन न होणारा
तरीही तारुण्यातील आठवणींनी
मन कासावीस करणारा...
असा पाऊस आठवणीतला...
हवाहवासा वाटणारा!
-विलास समेळ,

हा पाऊस बाई बाई


किती रंग उधळूनी जाई, हा पाऊस बाई बाई

कधी गुमान निघुनी जाई
कधी वाजत-गाजत येई
मृदगंध उधळण्या घाई... हा पाऊस बाई बाई

हा निरोप्याच सजणाचा
वर्षाव करी मदनाचा
अन तन-मन व्यापून जाई... हा पाऊस बाई बाई

पायांस बांधुनी चाळ
हुंदडतो रानोमाळ
डोहात विसावा घेई... हा पाऊस बाई बाई

अवघडल्या बाईवाणी
घन अवघडतो अस्मानी
कोसळून अमृत होई... हा पाऊस बाई बाई
वि. म. बोते, कागल

कडे कपारी हिरवी गाणी.....

कडे कपारी हिरवी गाणी

भिजले डोंगर
सजल्या रानी
कडे कपारी
हिरवी गाणी

मनास माझ्या
स्पर्शून गेली
सह्याद्रीची
हिरवी लेणी

डोंगरमाथे,
ओल्या वाटा
अवखळ वारा
सळसळ नजरा

नटुनी आली
चिंब पाखरे
रानफुलांचा
माळून गजरा

हे देवाचे
कसले देणे
पाझर फुटता
खडकालाही

कसे पाहावे
दृश्य देखणे
मर्यादा या
नजरेलाही
-माधव कुलकर्णी

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

ऋतू समंजस....


झाला ऋतू समंजस, वागे शहाण्यासारखा
आसमंतालाही वाटे जणू जिवलग सखा
येण्याआधी त्याने दिली वार्यासवे गंधवार्ता
आसावल्या धरेखाली झाला जणू दुःखहर्ता
गहिवरले आभाळ आले भरुनिया डोळे
गर्भारल्या धरणीचे पुरविण्यास डोहाळे
रानीवनी त्याच्यासाठी हिरवी स्वागत तोरणे
सृष्टीच्याही दृष्टीचेच आता फिटावे पारणे
फांदीतून डोकावते सान चिमणपालवी
टपोराल्या कळ्या आणि आली असे टवटवी
मंद वाहती निर्झर; हितगुज तृणासवे
पायवाटेच्या पदरापाचू झालर खुलवे
तोलान्यासी आभाळाला थवा पाखरांचा उडे
धरणीच्या आनंदाला स्वर्गसुखही तोकडे

थेंब थेंब पावसाचा....

थेंब थेंब पावसाचा
अंगावरी झेलताना
मनामधी येई हसू
ओले अंग झाकताना

थेंब थेंब पावसाचा
हळू पडे गालावर
रानातल्या मोरागत
मन नाचे तालावर

थेंब थेंब पावसाचा
किती ओंजळी भरावा
लई खट्याळ पाऊस
त्याचा वेगळा गारवा

थेंब थेंब पावसाचा
मोती केसात माळतो
काय सांगू सईबाई
मज सखा आठवतो

थेंब थेंब पावसाचा
ओलेचिंब झाले रान
नव्यानवेल्या प्रीतीचं
ओठावरी येई गाणं

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

पाऊस आला कि...


पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजली कि तुझी आठवण येते

चिंब पावसात मी तुझ्याबरोबर भिजायची
छत्री असूनही ती बंद असायची

चिखलात तू मुदाम्हून चालायचास,
मी ओरडेन तुला हि वात पहायचास

वाटेतल्या स्टॉलवर जाऊन चाय पीत बसायचो
आपण तेंव्हा किती गप्पा मारायचो

मला मात्र तुझा खूप राग यायचा,
कारण तू पावसात नेहमी भिजायचा,

भिजून तू आजारी पडू नये ही भीती वाटायची
तुला काही होऊ नये हीच काळजी असायची

जोरात पाऊस आला कि आजही तुझी काळजी वाटते,
तू भिजत तर नाहीस ना म्हणून मनास भीती वाटते

पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजली कि तुझी आठवण येते.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!



आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

रखरखत्या उन्हात काले ढग जमले…….
पावसात भिजण्यासाठी मग मन रमले…..!
अचानक एक वीज चमक्ली……
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

अंगाची लाही लाही होत होती…….
मनात भिजण्याची तमन्ना झाली….
कुठून एक सर आली……
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

एक थेम्ब मग वरुन पडला तळहातावर…….
ओंजलित घेउन मग त्याच्याकडे पाहू लागलो
ढग सरला……सूर्य तापला
थेम्ब वाफ होउन उडून गेला…….

पुन्हा केंव्हातरी एक ढग येईल……
मनास पावसाची चाहुल देईल…….
अचानक वीज चमकेल……..
आम्हास वाटेल……..आत्ता पाउस पडेल…..!

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली.......



श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली.......
खुप दिवसानंतर आज
मला ती पुन्हा दिसली
जेव्हा श्रावणाची पहीली सर
आज पुन्हा माझ्या दारी बरसली

फ़ेर धरुन ती आज पुन्हा
माझ्या अंगणी नाचली
तिन्ही विश्वाची दौलत
जणु तेव्हा मला
त्या तीन क्षणातच मिळाली


काय सांगु मित्रांनो..............


ही ना नेहमी अशीच येते
वाट पाहणा-या कोरड्या
पापण्यांवर मग ती गार ओलवा रचते
ओला स्पर्श मी करताच
गुलाबी गाली मोहक लाजते
श्रावणाची ही सर जेव्हा
माझ्या दारी बरसते

आज ती पुन्हा तशीच आली

तिच्या गरम श्वासांच थबकणं,
तिच्या कोमल ओठांच थरथरणं
आज मी भिजल्या नजरेनं पाहील
तिच्या प्रेमाच्या प्रीतील आज मी,
ह्रुदयात जपुन ठेवलं
वाटलं जणु तेव्हा मनाची
हरऎक इछचा पुर्ण झाली
श्रावणाची ही पहीली सर जेव्हा
आज पुन्हा दारी आली .......

पाउस असा हा झरतो



पाउस असा हा झरतो
पानांतुन गाणी गातो
नभ घेवुनी उशाशी
मोत्यांची स्वप्ने देतो
ओल्या मनात माझ्या
दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा
हातावरी उमटतो
थेंबात ये रुपेरी
घेई खुशाल झोके
मातीतुनी उगवती
त्याची अनंत रुपे
पाउस आसमंती
पाउस अंतरात
पाउस होवुनी मी
माझ्या मनी त्रुषार्त

एखादा पावसाळा............!!!!!!!!



पाऊस म्हणजे काय?
तर शरीराबरोबर मनालाही चिंब भिजावणारा,
जतन केलेल्या आठवणी अलगदपणे उलगडायला लावणारा.
मित्र-मैत्रीणिंबरोबर पाण्यात सोडलेल्या होड्या,
आणि ऐन वयात आल्यावर पावसात भिजून काढलेल्या खोड्या,
सगळ काही नजरेसमोर अचानक नाचू लागत,
अगदी कालच घडल्यासारख ते वाटू लागत.
पावसात भिजल्या नंतर मनाचा कोपर्‍यात दाडपूण टाकलेल्या गोष्टीही आठवू लागतात,
आणि त्याही मग नकळत चेहरयवर एक हसू आणतात,
ती पावसात भिजलेली आठवनही आपल्याला हविहवीशी वाटते,
लोकात नकार देउन सुद्धा आपल्या मनात तीच आठवं दाटते.
नेहमी चिक-चिक करणारा पाऊस ही आपल्याला सुखाऊ लागतो,
अशी भेट रोजच होईल का? आपण मनालच विचारू लागतो,
असे तर अनेक पावसाले येतात आयुष्यात,
पण काही पावसाले मनात घर करून राहतात.
भरपूर वेगळ घडत आयुष्यात,
पण या आठवणी नेहमी सारख्याच वागतात,
म्हणूनच सांगते मित्रांनो,
एखादा असा पावसाळा पुढचे अनेक पावसाळे काढायला पुरेसा असतो,
कारण तो पावसाळा मनाच्या कप्प्यात जपलेला असतो,
अगदी आयुष्यभारासाठी

नको नको रे पावसा ...!!


नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत

आला आषाढ-श्रावण


आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!
बा.सी.मर्ढेकर

एकटेपण..

एकटेपण..
पाण्याच्या एकाच थेंबासारखं..

कधी पहाटेच्या दवाच्या टिपासारखं,रसिक,
धुक्याचा हात धरून अलगद पाकलिवर उतरनारं..

कधी हळवं,
भुईवर उतरताच तिच्या भेगाना जिरवता जिरवता स्वतःच जिरणारं..

कधी नादखुलं,
दिसेल त्या उतराच्यानादाला लागुन, डबक्यात अडकणारं..

कधी व्यवहारी,
मातीवर टेकताच समुद्राचा रस्ता शोधणारं…

कधी भाबड़,
पावसाच्या करंगलिला सोडून, उगाचच कुणाच्या खिडकिशी डोकावनारं..

कधी रागीट,
रागात येवून विजेच्या तारावर जिव जाईपर्यंत लोंबकालणारं..

कधी हसरं,
हजार थेंबासोबत खदखदून हसनारं,
पण, नेहेमीच, एकट..

वेड ते एकटेपण, आणि वेडा तो थेंब..
दोघात नातं एवढच की,
एकटेपणात साथ देतो,तो पापणीखालचा एकटाच थेंब..

साथ असली त्याची, तरी सोबत नसत मन
थेंब जातो सुकून, पण झोंबत राहातं, ते एकटेपण….


भरून आलेलं आभाळ....................



भरून आलेलं आभाळ जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व तेव्हा मला कळू लागतं...

धावून येणारा पाऊस, नखशिखान्त भिजवू पाहतो...
बेधुंद.. बेभान वाऱ्याला, जबरदस्तीने थिजवू पाहतो...
मनाच्या कोपऱ्यात तुझी आठवण, पुन्हा घरटं बांधते...
आणि.. प्रीतिचं वेडं पाखरू... पुन्हा त्यावर घोटाळू लागतं...

भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...

जमिनीवर पडणारं पाणी, ओढ्याचं रुप घेऊन धावतं...
पावसाचं हे चैतन्य, निसर्गाच्या ओंजळीत सामावतं...
तहानलेली धरती तृप्त होऊन, हिरवा शालू पांघरते...
माझं मन मात्र मातीच्या सुगंधात मिसळू लागतं...

भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...

अशा धुंद वातावरणात, मी सहज फिरायला निघतो...
सभोवतीच्या मोहकतेला नजरेनेच प्यायला बघतो...
चालता चालता वाटेवरचं, ते ओळखीचं वळण येतं...
तू तिथे पुन्हा भेटावंस... हे माझं स्वप्न, वास्तवात विरघळू लागतं...

भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...

सृष्टीचं सौंदर्य पाहून, मी मुग्धच होऊन राहतो...
मनाच्या दर्पणातही पुन्हा, तुझेच प्रतिबिंब पाहतो...
दूरवर पेटलेल्या शेकोटीची धग, अंगाला जाणवू लागते...
माझं मन मात्र एकांताच्या, आगीतच जळू लागतं...

भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...

जेव्हा कधी तुझ्या आठवणी मनामध्ये दाटून येतात...
मला पुन्हा भूतकाळात खेचून नेतात...
वेदनांचा श्रावण पुन्हा एकवार मुसळधार बरसू लागतो...
अन हृदयीचं दु:ख अश्रू बनून डोळ्यांवाटे ओघळू लागतं...

भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...

दोन थेंब...


पावसाचे दोन थेंब ढगातुन
निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत,
ढगाच्या तुकड्यांना चुकवत,
पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.
एकाला रहावल नाही,
त्यान संवाद सुरु केला-"आता
पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे,
बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय,
आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?"
"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.
आपला वेग आपल्या हाती नाही,
आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही
आणि

कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!"

"मग आपल्या हाती काहीच नसताना

विचार करुन आणि अंतर्मुख होउन

काय करणार आहेस?

त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली,

की अनंतात विलीन होउन जाऊ."
"त्याने काय होणार?

कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे

ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो,

त्याच क्षणी अपल भवितव्य ठरलेल असत

.ढगाला आपला भार असह्य झाला,

की तो आपल्याला सोडून देणार.

मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन

खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.

यात आपण काय करू शकतो?"...

"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात
आणि जीवनाच्या थेंबाला स्वताचा
जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, अपाला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय?
तर थेंबाच अस्तित्व संपत.
आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"
"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,
एवढ समजुन घे
.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू
आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"

"बरा भेटलास,बोल
,काय गप्प मारणार होतास माझ्याशी?"
"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत
.मी तुला प्रश्न विचारतो,
आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?"
"म्हणजे अस बघ,
बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात
आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो,
की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का?
आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही
.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला
उगाचच काहीतरी महान अर्थ
चिकटवत पडू नकोस."
"पण, समज आपण स्वताचा असा
समज करुन घेतला, की आपण त्या
बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात
भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......
मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात,
ते किड्यांना खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात.
त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."

"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
"समज
,
कुणीतरी पर्जन्यदैन्य होता म्हणुन आपण पडलो.
पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही
.मग यांच्यामुळे आपण पडलो,
अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही
आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी
देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल,
तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला
तर मला आनंदच वाटेल!"
"आता कस बोललास?
नाही तरी आपण पडणार तर आहोच,
मग त्या पडण्याला असा अर्थ दि
ला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार?
आता आणखी एक गम्मत
.तुला जर choice दिला आणि विचारल
, की बोल तुला कुठे पडायचे आहे,
तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.
कुठेतरी दोन धुंद जीव
एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील
तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,
भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ होउन
आकाशाकडे पाहत असते
तिच्या तृप्तीचा पहिला थेम्ब व्हाव,
एखाद अवखळ मूल खिडकित बसून
तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर
त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव..
एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून
फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!
" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता
हरखून गेला होता.
पहिल्यान बोलन संपवल तेव्हा
तो भानावर आला आणि म्हणाला,
"अरे आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत,
असा विचारच नव्हता केला मी कधी!"

एक आजोबा हातात पिशवी सांभाळत,

वाऱ्याने उलटी होत असलेली

छत्री सावरत कसेबसे चालत होते.

पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला

आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.

चाफ्याच डौलदार झाड़

दुधाळ फुल अंगावर लेवून

हिरवी वस्त्र नेसून सजल होत

.भार सहन न होउन पान वाकल आणि

थेंबन जमिनीवर उडी घेतली.

तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.

दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय,

वाफ होउन ढगात जाण्याची आणि

पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.

थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

पाऊस तुझ्या आठवणींचा......

माझे ह्र्दय चिंब भिजवुन टाकनारा
तरीही कोरडच आहे मी

पाऊस तुझ्या आठ्वनींचा.........
दिवस रात्र कोसळणारा
तरीही तहानलेलाच आहे मी

पाऊस तुझ्या आठवणींचा......
तुझ्या खोट्या प्रेमाची साक्ष देणारा
तरीही प्रेम करतोच आहे मी...........तुझ्यावर

पाऊस तुझ्या आठवणींचा......
आसवांचे महापुर घेउन येनारा
तरीही हसतोच आहे मी

पाऊस तुझ्या आठवणींचा......
जगण्यापेक्षा मरण चांगल वाटायला लावणारा
तरीही जगतोच आहे मी
तरीही जगतोच आहे मी

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

कसे सांगू पावसाला?

कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
घर असे हे पडके
जणू घर नाही आता
आहे ओले हे थडगे
घरी असा एकटा मी
म्हातारा कुचकामी
पुत्रदर्शन दुर्मिळ
सणावारी कधीकाळी तो दारी या
धडके कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
चार पैसे धाडी मला
ठेवाया नोकरगडी घरा
दोन बोटे पत्र नाही
बाळा संपली का शाई?
असे कसे मन ह्याचे
झाले कठोर कोडगे
कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
लोक हसती मला
उगाच उपहास
हा औषधांचा मारा
पथ्य आणि उपवास
वर अंगावर नाही
धुपे सुके फडके
कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
आता येऊ दे
पूर संपू दे किरकिर
कुणी मारेल खांदा
कुणी धरेल मडके
कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके

पाऊस आलाय….भिजून घ्या

पाऊस आलाय…।भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच॥
त्याला औषध तेच तेच॥
प्यायचेच आहेत नंतर काढे,
आधी अमृत पिऊन घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या

आला आला पावसाळा

आला आला पावसाळा
ही रचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसिद्द झाली आहे.
दूर गेल्या ग्रीष्म झळा पळाला उन्हाळा स्रुष्टीला या सजवाया आला पावसाळा १
पावसात खेळायला चला सारे जाऊ भिजताना पावसाची गाणीपण गाऊ २
नका कुणी उघडू रे काळी कुट्ट छत्री पावसाशी सारे जण करू घट्ट मैत्री ३
वेगे वेगे अंगावरी झेलू जलधारा भरे जरी हुडहुडी तरी वेचू गारा ४
"थेंबे थेंबे साचे तळे" शिकू अशा म्हणी मनामध्ये साठवता विसरे ना कुणी ५
खळाळत्या ओहोळात सोडू खूप होड्या कुरबुरी करू नका केल्या कुणी खोड्या ६
माशासम पाण्यामध्ये पोहू या कां सारे?किंवा मोर होऊनिया फुलवू पिसारे ७
तळ्यावरी भिरकावू थोड्या ठिक-या आईपेक्षा मोठ्या थापू सा-या भक-या ८
तां ना पि हि नि पां जां इंद्रधनू रंग भान हरपुनी पाहू सात रंग संग ९
धरित्रिच्या अंगावरी बरसता थेंब पहा झणी फुटताती हिरवेसे कोंब १०
थांबू थोड़े, राहू उभे पाघोळ्याच्या खाली मोतीयाचे थेंब सजे प्रत्येकाच्या गाली ११
गारठुनी अंगावरी येताच शहारे,कानावर तेंव्हा पड़े आईच्या हाका रे १२
सटासट, लगोलग नका कुणी शिंकू गारा वेचण्याची स्पर्धा कोण शके जिंकू? १३
मुक्तपणे चरताती गुरे कुरणांत घुंगरांच्या माळा गळा घुणघुणतात १४
झाडांच्या त्या फांद्यावरी जमतील पक्षी खेळ मौजेचा आपुला तेथुनी निरीक्षी १५
रोज उगायचा वसा सूर्य विसरला किरणांचा गालिच्छा कां अन्य पसरला? १६
सोसाट्याचा वारा नेई पावसाला दूर चिंब भिजू तोवरीच खेळू भरपूर १७
आला आला म्हणतांना गेला रे पाऊस कल्पनेच्या विश्वामध्ये फिटली रे हौस १८

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

विरहाचा पाऊस


पावसाची एक सर
अलगद बरसून गेली
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शून गेली...
मन झाले ओलेचिंब
गळाही दाटून आला
पावसाचे काळे ढग माझ्या
डोळ्यात साठवूनी गेला....
बेधुंद होऊनी मग
पावसाच्या सरी झेलत राहिली
तुझ्या विरहाच्या पावसात
बेभान होऊन भिजत राहिली...
सुटला सोसाटयाचा वारा
अंगाशी येऊन झोंबला
त्या वार्यातही मला
तुझाच स्पर्श जाणवला
नकळत शरीर स्तब्ध झाले
मन माझे भूतकाळात रमले
डोळ्यात अश्रुंचे ढग साठले
बरसत राहिल्या तुझ्या आठवणी
मन त्यातच भिजत राहिले...
सुवर्णा मेस्त्री

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

एक दिवस सायकलचा....




दिवस निघाल्यापासूनच,
सुरु होते वाहनांची गर्दी,
अन पायी चालणार्यांची इथ,
लागत नाही वर्दी...
प्रदूषण वाढल म्हणणारे
आहे इथ दर्दी,
खर पाहायल गेल तर त्यांच्याच
घरी वाहनांची गर्दी...
एक माणूस एक वाहन,
अशी आजची स्थिती,
अन अपघातात मराची
सार्यायलेच लागते भीती...
अशा या परीस्थितीले,
आता तुम्ही टाळा,
अन आठवड्यातून एक दिवस,
सायकल पाळा.........

शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

बागुलबोवा

रात्र पसरते जेंव्हा भवती समोरच्या त्या आंब्यावरती येऊन बसतो बागुलबोवा कुणा न कळतो त्याचा कावा ! मी तर या डोळ्यांनी पाहे भीषण त्यांचे रूप असे हे : पिकलेली डोक्यावर शेंडी -तागाची तकतकती पेंढी ! गरगर फिरती हिरवे डोळे -गारेचे चकमकते गोळे ! आणिक खाली नाक फदाडे पडक्या भिंतीतील कोनाडे ! जीभ फिरे दातांतून पाही -सुसर जशी खडकातून येई. दांत वाटती दगडच काळे कान सुपाच्याहून मोठाले. -बागुलबोवा पण म्हातारा उमर त्याची काय विचारा : "सात कमी वय सात हजारा !" काही न त्याला दुसरे पचते, पोर शेंबडे रडावे रुचते ! घेऊन जातो असली बाळे आणिक भरतो अपुले ढोले ! पसरूनि पाने नंतर त्यावर आपण बसतो त्या पानांवर; आणिक जेंव्हा पिकते आडी एक हळू मग खाण्या काढी! झाड पहा ते पुढचे हाले बागुलबोवा तिकडे गेले ! -विंदा करंदीकर