शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

भरलेला पाऊस मी


भरलेल्या डोळ्यांनी पाहिला होता..
भर पावसात हात निसटताना ही
अश्रू डोळ्यात राहिला होता...

होते रुसवे फुगवे, होते अनेक बहाणे
तिला चिडवून तिलाच समजाविणे..
तिच्या आठवणीत मन माझे शहारले होते
तिच्या सोबत घालवलेले क्षण तेव्हा डोळ्यातून निसटले होते...

माझे अश्रूसुद्धा त्या पावसात मिसळले होते
साथ माझी सोडताना मी त्यांना पाहिले होते..
मनाचा नभ डोळ्यांच्या कडांवर विसावला होता
तू दूर गेल्यावर तो बांधही त्यांनी फोडला होता...

सुटलेला गार वारा मला स्पर्शुनी सांगत होता
आता हा खेळ फक्त आठवणींचा राहिला होता..

भरलेला पाऊस मी.. भरलेल्या डोळ्यांनी पाहिला होता.

1 टिप्पणी: