अंगावरी झेलताना
मनामधी येई हसू
ओले अंग झाकताना
थेंब थेंब पावसाचा
हळू पडे गालावर
रानातल्या मोरागत
मन नाचे तालावर
थेंब थेंब पावसाचा
किती ओंजळी भरावा
लई खट्याळ पाऊस
त्याचा वेगळा गारवा
थेंब थेंब पावसाचा
मोती केसात माळतो
काय सांगू सईबाई
मज सखा आठवतो
थेंब थेंब पावसाचा
ओलेचिंब झाले रान
नव्यानवेल्या प्रीतीचं
ओठावरी येई गाणं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा