बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

कडे कपारी हिरवी गाणी.....

कडे कपारी हिरवी गाणी

भिजले डोंगर
सजल्या रानी
कडे कपारी
हिरवी गाणी

मनास माझ्या
स्पर्शून गेली
सह्याद्रीची
हिरवी लेणी

डोंगरमाथे,
ओल्या वाटा
अवखळ वारा
सळसळ नजरा

नटुनी आली
चिंब पाखरे
रानफुलांचा
माळून गजरा

हे देवाचे
कसले देणे
पाझर फुटता
खडकालाही

कसे पाहावे
दृश्य देखणे
मर्यादा या
नजरेलाही
-माधव कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा