झाला ऋतू समंजस, वागे शहाण्यासारखा
आसमंतालाही वाटे जणू जिवलग सखा
येण्याआधी त्याने दिली वार्यासवे गंधवार्ता
आसावल्या धरेखाली झाला जणू दुःखहर्ता
गहिवरले आभाळ आले भरुनिया डोळे
गर्भारल्या धरणीचे पुरविण्यास डोहाळे
रानीवनी त्याच्यासाठी हिरवी स्वागत तोरणे
सृष्टीच्याही दृष्टीचेच आता फिटावे पारणे
फांदीतून डोकावते सान चिमणपालवी
टपोराल्या कळ्या आणि आली असे टवटवी
मंद वाहती निर्झर; हितगुज तृणासवे
पायवाटेच्या पदरापाचू झालर खुलवे
तोलान्यासी आभाळाला थवा पाखरांचा उडे
धरणीच्या आनंदाला स्वर्गसुखही तोकडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा