शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

माझ्या महाराष्ट्रीयन बंधूनो!

माझ्या महाराष्ट्रीयन बंधूनो!
माझ्या महाराष्ट्रियन बंधू भगिनींनो
ऐका आपल्याच भावंडांचा आर्त टाहो
पन्नास वर्षाच्या स्वातंत्र्यातही
कर्नाटक राज्यात आम्ही गुलाम हो!

होते, आहोत, असू मराठे
जन्मजात आम्ही महाराष्ट्रीय बेटे
मायमराठी हि दुधामृत वाटे
परी जीवन आमुचे तिथे करंटे

रथी महारथी थोर योद्धे मराठी
गेले खंगुनी गांधीमार्ग आचरुनी
सत्याग्रहाचे तत्व त्या कर्नाटकी
नसूनी टाकले त्या कुराज्यकर्त्यांनी!

मान सन्मान भारतात माझ्या
स्वातंत्र्य भोगण्या मिळे इतरांना
आम्ही मराठे २० लाख असताना
कर्नाटकातील गुलाम म्हणा ना !

मराठी शिकणे आणि लिहिणे
गुन्हाच येथे मातृभाषा बोलणे
नाही नोकरी नाही धंदा-काम
तिथे वेळोवेळी आहे सहणे अपमान

खावालुनी उठू सभामोर्चात जमत गणांचे
रक्त शिवगणांचे सळसळू लागे
गल्लीत अडवून पोळीचे मारती
रक्तात डोकी पथ रंगवू लागे !

मुंबई दिल्ली वार्या करुनी
दमात आले बाबा म. ए. स. नेते
वाटाळ गोकाक कानडी मस्ते
'सीमाप्रश्नाच्या' मान्गुतीस भुते!

'एक इंच भूमिही मिळणार नाही!
कन्नड कौरवजन उर्मट वदती
असुनी खरी हि महाराष्ट्र भूमी
महाराष्ट्र पांडव द्यूतात हरती!

'मराठू मातेच्या पदरी घाला हो
दिल्लीश्वरापुढे फोडला टाहो
'संपूर्ण महाराष्ट्र ही आर्त आरोळी
कानी पडती तरी ऐकू न घेती हो

संग माझ्या महाराष्ट्र बांधवा,
बेळगाव, खानापूर, निपाणीच्या लोक
राहू कर्नाटकी असे रडत- सडत
कि तिथेच मारावे " जय महाराष्ट्र " म्हणत???
सीमावासी कवी- जोतीबा पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा